Tiranga Times Maharastra —
प्रदर्शनाला वीस दिवस उलटल्यानंतरही आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरू आहे. चौथ्या रविवारीही चित्रपटाने विक्रमी कमाई करत जगभरात 1050 कोटींचा टप्पा पार केला असून, अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत ऑल टाइम सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ख्रिसमस सुट्ट्यांचा मोठा फायदा मिळाल्याने परदेशातही चित्रपटाने दमदार कमाई केली असून अवघ्या 24 दिवसांत जागतिक कलेक्शन 1064 कोटींवर पोहोचले आहे.
धुरंधरने अवघ्या काही दिवसांत जागतिक बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत भारतीय सिनेमासाठी नवा मानदंड निर्माण केला आहे.
